‘जिला गोरखपूर’ चित्रपटातून दिसणार राजकारणातील ‘योगी’

153

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – एखाद्या विषयाला किंवा महत्त्वाच्या मुद्द्याला तितक्याच समर्पकपणे हाताळत आजवर अनेक चित्रपचट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. तो चित्रपट म्हणजे, ‘जिला गोरखपूर.  उत्तरप्रदेशच्या राजकीय पटलावर नेतेमंडळी नेमके कशी चाल करुन एकमेकांवर कुरघोडी करतात याचे चित्रण ‘जिला गोरखपूर’मधून करण्यात आल्याचे कळत आहे.

विनोद तिवारी यांनी या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आणली. ज्यामधून बऱ्याच गोष्टी पाहताच क्षणी लक्षात येत आहेत. नोस्ट्रम एंटररटेन्मेंटची प्रस्तुती असणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक व्यक्ती पाठमोरी उभी दिसत आहे. केशरी रंगाची शाल अंगावर ओढलेल्या या व्यक्तीचे हात मागे असून, त्यामध्ये बंदुकही दिसत आहे. गंगा नदीच्या किनाऱ्याकडे एकटक पाहणाऱ्या त्या व्यक्तीचा चेहरा अद्यापही सर्वांसमोर आलेला नाही. पण, सध्यातरी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीनवावर आधारित काही प्रसंगांचे चित्रण या चित्रपटातून करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.