जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण; माजी उपमहापौर दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

49

पुणे, दि. ५ (पीसीबी) – आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयात आज (मंगळवार) याप्रकरणी सुनावणी झाली.

पुणे शहर पोलीस दलातील गनमॅन शैलेश जगताप यांचे मोठे बंधू जितेंद्र जगताप हे दीपक मानकर यांच्याकडे काम करायचे त्यांनी शनिवारी (दि.२) हडपसर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे गाडी समोर उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जगताप यांनी चिठ्ठी लिहून त्यामध्ये दीपक मानकर, पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्यासह अण्य पाच जणांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर माजी महापौर दीपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्यासह पाच जणांवर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अधिक तपासासाठी समर्थ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

आत्महत्येच्या एका दिवसाआधी मृत जितेंद्र जगताप हा आपल्याला पैशाची मागणी करत होता आणि पैसे न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत असल्यासंबंधीचा तक्रार अर्ज मानकर यांनी शुक्रवारी (दि.१) पोलीस आयुक्त कार्यालयात आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिला होता.

मात्र समोवारी (दि.४) समर्थ पोलिसांनी जितेंद्र जगताप यांच्या चिठ्ठीत उल्लेख असणाऱ्या सुधीर सुतार (वय ३०), विनोद भोळे (वय ३४), अमित तनपुरे (वय २८), विशांत कांबळे (वय ३०) आणि अतुल पवार (वय ३६) यांना य अटक केली. तर दीपक मानकर आणि बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज मंगऴवार सुनावणी झाली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. यामुळे या दोघांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याचे वर्तवण्यात येत आहे.