जिओचा गीगा टीव्ही लाँच; नवा फोनही भेटीला येणार

92

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या. रिलायन्स जिओने आता टीव्हीही (जीओ गीगा टीव्ही) लाँच केला आहे. तसेच रिलायन्स जिओचा नवा फोनही भेटीला येणार आहे. इतकेच नाही तर १५ ऑगस्टपासून जिओ फोनवर आता यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप फुकटात उपलब्ध होणार आहे.

यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह ईशा आणि आकाश यांनी जिओ २ लाँच केला. १५ ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध असेल. जिओ फोन २ सह गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटरही लाँच करण्यात आले.