जावयाने केला सासूवर कोयत्याने हल्ला

72

वाकड, दि. १३ (पीसीबी) – जावयाने सासरी येऊन दुचाकीची तोडफोड करत सासूवर कोयत्याने हल्ला केला. गोंधळ घालून जावई निघून गेला. याबाबत सासूने जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गंगाधर उर्फ नाना महादेव सोनवणे (वय २८, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील, मुलगी सोनाली आणि नातू श्री (वय ६) हे घरी असताना जावई आरोपी गंगाधर फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या दारात लावलेली दुचाकी फोडून नुकसान केले. त्यानंतर ‘मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून कमरेला असलेला कोयता काढून फिर्यादी यांना मारण्यासाठी उगारला. मात्र फिर्यादी खाली पडल्याने कोयता लागला नाही. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांचा मुलगा, मुलगी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आरडाओरडा केला. आरोपी हा फिर्यादी यांना वारंवार त्रास देत त्याच्या विरोधात यापूर्वी दखलपात्र व अदखलपात्र गुन्हा नोंद असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.