जाळपोळ व पोलिसांवर दगडफेक; सरकार अस्तित्वात आहे का? – उच्च न्यायालय

9

मुंबई, दि. २ (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकरकॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या आंदोलनातील हिंसाचाराबद्दलही नाराजी व्यक्त केली. राज्यातील सध्याची परिस्थिती फारच विदारक आहे. बसेस जाळल्या जातात, पोलिसांवर दगडफेक सुरु आहे. राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही ?, अशा शब्दात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.