‘जाळपोळ अन् हिंसाचार थांबवा, सरकार आरक्षण देईल’- नारायण राणे

29

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली असून राज्यातील हिंसाचार बंद व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे. तसेच आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यास सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, असेही राणेंनी सांगितले.