जाब विचारल्याने पेंटरचे अपहरण करून मारहाण

258

निघोजे, दि. १३ (पीसीबी) – कामाला लावतो मात्र कामाचे पैसे देत नाही. असा जाब पेंटिंग काम करणाऱ्या कामगारांने विचारला. त्या कारणावरून पाच जणांनी मिळून पेंटर कामगाराचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी साडे दहा ते बारा वाजताच्या कालावधीत निघोजे येथे घडली.

मंगल भिमराव सपकाळ (वय 32, रा. झित्राईमळा, चाकण) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन प्रताप सोनवणे, मंगेश प्रताप सोनवणे, रुपेश बागडे, चेतन माळी आणि एक अनोळखी मुलगा (सर्व रा. झित्राईमळा, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन सोनवणे हा मुलांना कामाला लावतो व कामाचे पैसे देत नाही, अशी फिर्यादी कामगार मंगल सपकाळ यांनी विचारणा केली. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांचे अपहरण केले. त्यांना दुचाकीवर बसवून निघोजे येथे नेऊन लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.