जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान; मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर विठूपूजा

91

पंढरपूर, दि. २३ (पीसीबी) – पंढरपुरात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत.

शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचे यावेळी जाधव दाम्पत्याने सांगितले. महापूजेवेळी जलसंपदामंत्री गिरिश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह शिवसेनेचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

दरम्यान, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली होती. या दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरश: उजळून निघाला होता.