जाधववाडी येथे लाकडाच्या गोडाऊनला आग

172

प्रतिनिधी, दि. २० (पीसीबी) – चिखली येथील जाधववाडी मध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. अग्निशमन दलाचे चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून ही घटना रंजन वजन काटाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार जाधववाडी चिखली येथे रंजन वजनकाट्याजवळ असलेल्या लाकडाच्या गोडाऊनला आज (दि.२०) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले.

आग विजविण्याचे काम चालू असून कोणीही जखमी झाले नाही अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतू अगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

WhatsAppShare