जातीनिहाय आरक्षणात कोणतेही बदल केले जाणार नाहीत – पंतप्रधान मोदी

97

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सध्याच्या सर्वाधिक  बहुचर्चित  विषयांवर भाष्य केले.  एका वृत्तसंस्थेला दिलेल्या  मुलाखतीत  मोदी यांनी एनआरसी, आरक्षण आणि मॉब लिंचिंग आदी विषयांवर आपले परखड भाष्य केले. ही मुलाखत २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार  आहे.