जागेत अतिक्रमण करून सुरक्षारक्षकाला शिवीगाळ; 12 जणांवर गुन्हा दाखल

188

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – बांधकाम सुरू असलेल्या जागेत बारा जणांनी अतिक्रमण केले. तसेच सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करून धमकी देत दहशत निर्माण केली. याबाबत 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास हिंजवडी फेस तीन येथील मेगापोलीस प्रोजेक्ट येथे घडली.

रोहिदास किसन सावंत, जेसीबी चालक, चार महिला आणि अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तानाजी आनंदा गायकवाड (वय 53, रा. सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मेगापोलीस सोसायटीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करतात. मंगळवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास आरोपी जेसीबी घेऊन विनापरवाना एका भूखंडावर आले. त्यांनी भूखंडावरील कंपाऊंड तोडून नुकसान केले. आत मध्ये असलेल्या सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.