जागतिक पारिचारिका दिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे परिचारिकांचा सन्मान

272

पिंपरी,दि.१३(पीसीबी) – जागतिक पारिचारिका दिवस निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अध्यक्ष इम्रान भाई शेख यांच्या वतीने सिटी हॉस्पिटल येथील नर्स यांचा केक कापून व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गेला.

यावेळी युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख म्हणाले “पेशंटच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नर्सकडून दिले जाणारे योगदान फार मोलाचे आहे. रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी नर्सकडून रुग्णांच्या आवश्यक ट्रीटमेंट पूर्ण केल्या जातात. रुग्णांना शारीरिक, मानसिक बळ मिळावे यासाठी त्या दिवसरात्र मेहनत करतात. Covid-19 सारख्या महाभयानक महामारी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून पेशंटला बरे करण्याचं काम नर्स यांनी केल्याचं आपण पाहिल आहे. आज जागतिक नर्स डे साजरा करताना एकप्रकारे आपण सर्वांनी नर्सिंग संदर्भात जागृकता वाढवण्यासाठी काम केले पाहिजे.आरोग्य सेवेचा कणा असलेल्या जगातील सर्व परिचारिकांना ‘ इंटरनॅशलन नर्स डे’ च्या शुभेच्छा! आणि covid-19 या आजारात आपल कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या नर्सेस ना देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.”

यावेळी वरिष्ठ नर्स लता जाधव, जबिन खान, शितल खोकर, परविन नदाफ, ज्योती मोरया, रूपाली शिंदे, लता पटेल, या महिला नर्स यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुरुष नर्स ब्रदर अनिल कांबळे, ब्रदर साहिल शहा, यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल रावळकर,शहर सचिव ओम शिरसागर, दिनेश वाघमारे,पियूष अंकुश,मशाक सकरर्गी, अबिद तांबोळी,यशवंत भोईटे हे युवक कार्यकर्ते उपस्थित होते.