जागतिक परिचारिका दिननिमित्त परिचारिकांचा सत्कार

51

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्व जगभरात पाळला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.

पिंपरी चिंचवड शहराची लाईफ लाईन असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण कोविड १९ रूग्णालयातील सर्व परिचारिका गेली दीड वर्षे आपला जीवाची पर्वा न करता रात्रं-दिवस कोविड रूग्णांची सेवा करत आहेत. परिचारिका दिनानिमित्त वाय.सी.एम.च्या मेट्रन मोनिका चव्हाण, सहाय्यक मेट्रन निर्मला गायकवाड, सहाय्यक मेट्रन स्मिता शेटे, परिचारीका पंचशील कांबळे, स्टाफ नर्स संगिता पाटील, सहाय्यक इंचारज सरोजीनी दिवे, वार्ड आया सुजाता आढाव त्याचबरोबर चिंचवडगावातील ‘मोरया हाॅस्पीटल’ मधील कर्मचारी भगवान तांबे, मेट्रन एलिझाबेथ गीलबर्ड, स्वाती मिरजकर, परीचारिका संजीवीनी साळवे, सुकन्या वानखेडे यांचा गौरव भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, मनपा कामगार नेते अविनाश तिकोणे, भाजपा ओबीसी आघाडीचे मंडल उपाध्यक्ष महेशबाप्पू मिरजकर, भाजपा ओबीसी आघाडीचे शहर उपाध्यक्ष योगेशजी मोरे, भाजपा मंडल उपाध्यक्ष तेजसशेठ खेडेकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsAppShare