जळगांव महापालिकेत भाजपची सत्ता; सुरेश जैन यांचे संस्थांन खालसा   

59

जळगाव, दि. ३ (पीसीबी) – जळगाव महापालिकेवर गेली ३५ वर्षे निर्विवाद सत्ता असणाऱ्या माजी मंत्री सुरेश जैन धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीची आज (शुक्रवार) मतमोजणी झाली. ७५ पैकी भाजपने ५७ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले. तर एमआयएमला ३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपचाच महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.