जळगांवमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; ५ नगरसेवक भाजपच्या गळाला!

102

जळगांव, दि. ८ (पीसीबी) – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

मनपा गटनेते सुरेश सोनवणे, प्रतिभा कापसे, गायत्री शिंदे, शोभा बारी आणि मुख्तार बी.पठाण असे राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच ‘खाविआ’च्या २ आणि मनसेच्या एका नगरसेविकेनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे राष्ट्रवादीला आता चांगलाच धक्का बसला आहे.