जया प्रदांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आजम खान यांच्याविरोधात गुन्हा

140

रामपूर, दि. १५ (पीसीबी) – भाजप उमेदवार जया प्रदा यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते आजम खान  यांच्याविरोधात  रामपूरच्या शाहाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकऱणी महेश कुमार गुप्ता यांनी तक्रार दाखल केली होती. 

आजम खान यांच्या वादग्रस्त  विधानाप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मुलायम सिंह यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात  मुलायम भाई, तुम्ही समाजवादी पार्टीचे पितामह आहात.  तुमच्या समोर रामपूरमध्ये द्रौपदीचे चीर हरण होत आहे. तुम्ही भीष्माप्रमाणे मौनात राहण्याची चूक करु नका, असे म्हटले आहे.

ज्यांना हात पकडून आम्ही रामपूरमध्ये आणले,  त्यांनी १० वर्षे प्रतिनिधित्व केले.  त्यांचा खरा चेहरा समजण्यासाठी १७ वर्षे लागली.  तर १७ दिवसांमध्ये कळाले की यांची अंतरवस्त्रे खाकी रंगाची आहेत, असे वादग्रस्त विधान  आजम खान यांनी प्रचारसभेत केले होते. यावेळी  समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव  उपस्थित होते.