जम्मू-काश्मीरमध्ये हिंसक कारवाया; अनेक भागात पाकिस्तान आणि आयएसआयचे झेंडे फडकवले; भाजप कार्यकर्त्याची हत्या

432

जम्मू, दि. २२ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये आज (बुधवार) बकरी ईदच्या दिवशीच अनेक भागात रस्त्यांवर निदर्शने केली गेली. श्रीनगरच्या मुख्य चौकात पाकिस्तान आणि आयएसआयचे झेंडे फडकवत दगडफेक करण्यात आली आणि भारतविरोधी घोषणाही देण्यात आल्या.

कुलगाममध्ये मशीदीबाहेर जिथे एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले होते, तिथेच एक पोलीसही शहीद झाल्याचे समजते. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरही सोडला. दरम्यान, पुलवामात मध्यरात्री दोन वाजता दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्ते शब्बीर भट यांच्या घरी घुसून त्यांना गोळी घालून ठार करण्यात आले आहे. अनंतनाग येथे पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बकरी ईदनिमित्त खोऱ्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. तरीही सकाळी श्रीनगरमधील अनेक भागांत हिंसक कारवाया घडल्या.