जम्मू काश्मीरमध्ये पहिला हिंदू मुख्यमंत्री देण्यासाठी भाजपच्या हालचाली?

0
701

नवी दिल्ली,  दि. ५ (पीसीबी) – काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी  दिल्लीत एक (मंगळवारी)  बैठक घेतली.  पण या बैठकीत काश्मीरमधील संभाव्य  मतदारसंघ पुनर्रचनेवर चर्चा करण्यात आल्याच्या बातम्या आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.   

या बैठकीनंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच हिंदू मुख्यमंत्री बनवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत, अशीही चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पहिला हिंदू मुख्यमंत्री  देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत? मोदी सरकारला काश्मीर विधानसभेचे डिलिमिटेशन करायचे आहे?  गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये मंगळवारी काश्मीरसंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली, अशा चर्चांना उधाण आले.

अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणारी ही बैठक होती. परंतु त्यात डिलिमिटेशनची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे थेट काश्मीरपर्यंत त्याचे हादरे बसू लागले. काश्मीरमधील सर्व  पक्षांच्या उलटसुलट प्रतिक्रिया  येऊ लागल्या आहेत.

जम्मू-काश्मीर या राज्याचे हिंदूबहुल जम्मू, मुस्लिमबहुल काश्मीर आणि बौद्धबहुल लडाख असे तीन भाग पडतात.  जम्मू भागात ३७, काश्मीरमध्ये ४६ तर लडाखमध्ये ४ असे एकूण ८७ विधानसभा मतदारसंघ आहेत. काश्मीरवर वर्चस्व ठेवण्यासाठी कोणत्याही पक्षाला मुस्लिमबहुल खोरे जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळेच जम्मूमधील जागा लोकसंख्येच्या आधारावर वाढल्या,  तर ही स्थिती बदलता येऊ शकते, असे भाजपला वाटते.