जम्मू काश्मिर पालिका निवडणुकित भाजपचा अपेक्षाभंग

78

श्रीनगर, २२ (पीसीबी) – कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच जम्मू काश्मिरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. २८० जागांपैकी २१८ जागांसाठीचे कल हाती आले. या निवडणुकीत दुपारपर्यंत जे निकाल हाती आले त्यात भाजपा ४६, काँग्रेस २१, गुपकर (फारूक अब्दुल्ला, मुफ्ती महंमद आघाडी) ८९ तर अन्य ६२ जागांवर आघाडीवर होते. भाजपाला किमान १०० जागांची अपेक्षा होती, परंतु ज्या प्रमाणात ताकद लावली त्या तुलनेत कमी जागा मिळातील असे दिसत नाही. काँग्रेसचा एकही मोठा नेता प्रचारात आला नाही, तर फारूक अब्दुल्ला, मुफ्ति महंमद सैद या नेत्यांनी घरीच राहणे पसंत केले होते. भाजपा पूर्ण ताकदीने रिंगणात उतरली होती. राष्ट्रीय पातळीवरचे बडे नेते प्रचारासाठी उतरले मात्र, त्या तुलनेत जागा मिळताना दिसत नसल्याने भाजपाचा काहीसा अपेक्षाभंग झाला आहे.

बुलेट विरोधात बॅलेट अशीच ही निवडणूक होती. ऑगस्ट मध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतरचा हा पहिलाच जनमताचा कौल असल्याने ही निवडणूक महत्वाची समजली जाते. भाजपा विरुध्द सर्व असाच सामना होता. जम्मू परिसरात भाजपाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते, मात्र अन्य भागात नाकारल्याचे निकाल सांगतो. कलम ३७० चा निर्णय जम्मू काश्मिरच्या जनतेने स्पष्टपणे नाकारला आहे, असेच हा निकाल दर्शवितो. दरम्यान, भाजपाचे नेते शहनवाझ हुसैन यांनी भाजपा निश्चितच चांगल्या जागा घेईल असा दावा केला आहे. भाजपाचे प्रथम विजयी झालेले एजाझ हुसैन यांचे त्यांनी स्वागत केले. अन्य विजयी उमेदवारांचेही त्यांनी अभिनंदन केले.

WhatsAppShare