जमीन देण्याच्या बहाण्याने 40 लाखांची फसवणूक

104

काळेवाडी, दि. २२ (पीसीबी) – जमीन देण्याच्या बहाण्याने 40 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 2014 ते 21 मे 2021 या कालावधीत विजयनगर, काळेवाडी येथे घडली.

आनंद अमरनाथ लोणकर (रा. स्पाइन रोड, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. विनोद किशनचंद मतानी (वय 41, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणकर याने चऱ्होली आणि मोशी येथील जमीन देतो, असे सांगून मतानी यांच्याकडून सुरवातीला पाच लाखांचा धनादेश घेतला. जमीन खरेदीसाठी काही अंशी मोबदला म्हणून आणखी 35 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपीने मतानी यांना जमीन दिली नाही. मतानी यांनी पैशाची मागणी केली असता आरोपीने मारण्याची धमकी दिली. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare