जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी; पिंपळेगुरव येथे पुरूषांची अनोखी वटपौर्णिमा

68

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) –  मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटना पिंपरी- चिंचवड शहराच्या वतीने पिंपळे गुरव येथे पुरुषांनी अनोखे पध्दतीने आज (बुधवारी) वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी वडाच्या झाडाला सात फेरे घालून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, म्हणून मनोभावे पुजा केली. पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडाऊनजवळ वटपोर्णिमा साजरी करण्यात आली.  

भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालतात. तसेच सात जन्मी हाच पती मिळावा, व पतीला दीर्घआयुष्य लाभावे, यासाठी वटपोर्णिमा साजरी केली जाते. त्याच पध्दतीने पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुषांनीदेखील जन्मोजन्मी हीच पत्नी मिळण्यासाठी  वटपोर्णिमा साजरी केल्यास काहीही चुकीचे ठरणार नाही, असे संघटनेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले.

यावेळी प्लॅस्टिक न वापरण्याची व पर्यावरण जनजागृतीची शपथ घेण्यात आली. यावेळी  संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, संगिता जोगदंड, अॅड सचिन काळे, अरुण पवार, अरविंद मांगले, वसंत चकटे, मुरलीधर दळवी, हनुमंत पंडीत, एस.डी.विभुते, दिपक शहाणे, गजानन धाराशिवकर, दत्तात्रय घोरपडे, अदिती निकम, शांताराम पाटील, शिवानंत तालकोटी आदी उपस्थित होते.