जनहो, आता पर्यटनाला बाहेर पडू नका, कारण…

153

पुणे, दि. ११ (पीसीबी) – राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र निर्बंध लावले जात आहेत. आता राज्य सरकारने पर्यटनावरही निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घातली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील भूशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉईंट, मंकी पॉईंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉईंट, लायन पॉईंट, शिवलींग पॉईंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण या ठिकाणी पर्यटकांना बंदी असणार आहे.

मुळशी तालुक्यातील लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉईंट, सहारा सिटी, काळवण परिसर या ठिकाणी बंदी असणार आहे. तर हवेली तालुक्यातील घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला परिसरात पर्यटकांना जाण्यास मज्जाव असणार आहे. आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळाचांही यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला, भोर तालुक्यातील रोहडेश्वर गड, भाटघर धरण, तर वेल्हा तालुक्यातील तोरणा किल्ला, राजगड, पानशेत धरण यासारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना प्रशासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत या पर्यटनस्थळांवरती जाण्यास मज्जाव असणार आहे.