जनकल्याण समितीच्या वतीने शनिवारी पिंपळेगुवरमध्ये सन्मान स्त्री-शक्ती कार्यक्रमाचे आयोजन

146

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यासाठी शनिवारी (दि. १ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात सन्मान स्त्री-शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा अमृता फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तसेच पुणे महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख सुधीर गाडे प्रमुख वक्ते असतील. या कार्यक्रमात प्रियदर्शनी हिंगे, प्राजक्ता खानविलकर, रमा मालखरे, अदिती खोत, ओवी सातपुते, लक्ष्मी गालफाडे या कतृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी जनकल्याण समितीचे पश्चिम महाराष्ट्र संभाग कार्यवाह गोविंद यार्दी, पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पटवर्धन, कार्यवाह योगेश थेटे, विभाग कार्यवाह सुरेश झेंड, उपाध्यक्ष यशवंत कदम, समीर पाटील, उपाध्यक्षा डॉ. गीता आफळे, जिल्हा सहकार्यवाह नंदकिशोर डंबे, संदिप जगनाडे, जिल्हा संपर्कप्रमुख चिन्मय कवी, कोषाध्यक्ष संतोष निंबाळकर, कार्यालय प्रमुख भालचंद्र देशपांडे, कार्यालय सहप्रमुख श्रीकांत राजवाडे, जिल्हा सदस्य विकास भागवत, अर्चना भागवत, संभाजीराव निकम, भालचंद्र लेले, श्रीराम ढोरे, तेरवाडकर आदी उपस्थित असतील.