जगभरातील राष्ट्राध्यक्षांना मिठ्या मारणाऱ्या मोदींना राहुल गांधींच्या मिठीला हरकत का? – राज ठाकरे

39

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद मोदी यांची घेतलेली गळाभेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली आहे. या गळाभेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटर करून राहुल गांधी यांच्या कृतीचे सर्मथन करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

परदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी जगभरातील नेत्यांची गळाभेट घेतली आहे. आज मात्र राहुल गांधी मोदींची भेट घेण्यासाठी त्यांच्या आसनाजवळ आले. तेव्हा, मोदी उभे राहिले नाहीत. यावरच राज ठाकरेंनी भाष्य केले आहे.

‘जगभरातील राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या  मोदींना  राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार मोठ्या मनाने करण्यास  काय हरकत होती?’ असा सवाल करून राज यांनी मोदींवर टीका केली  आहे.

दरम्यान, टीडीपीने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता.  या अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा झाली. यावेळी राहुल गांधींनी नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला.