‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही घोषणा हात वर करुन देता येत नाही – नवाब मलिक

250

मुंबई,दि.२८(पीसीबी) – ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही घोषणा हात वर करुन देता येत नाही. हा तुमचा गैरसमज आहे. ती घोषणा तोंडाने देता येते, तुम्ही हाताने देऊन दाखवा’ असं अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी भाजपा आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उत्तर देत म्हटलं आहे.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना भाजपाचे विधान परिषदेतील आमदार भाई गिरकर यांनी नवाब मलिक यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणेवर हात वर करुन दाखवा अशी मागणी केली. यानंतर भाजपा आमदारांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुरु केला.

भाई गिरकर यांच्या मागणीवर उत्तर देताना, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही घोषणा हात वर करुन देता येत नाही. हा तुमचा गैरसमज आहे. ती तोंडाने देता येते, तुम्ही हाताने देऊन दाखवा’ असं नवाब मलिक म्हणाले आहेत.