छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी

99

मध्य प्रदेश, दि.१३ (पीसीबी) – मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच हा पुतळा पुन्हा बसवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

छिंदवाडा-नागपूर हायवेवरील एका चौकामधील शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवण्यात आल्याचे सांगत प्रशासनाने कारवाई केली. थेट बुलडोझरने शिवाजी महाराजांचा पुतळा अधिकाऱ्यांनी हटवला. या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मध्य प्रदेश सरकारवर चौफेर टिका झाली. प्रशासनाच्या या कृतीविरोधात छिंदवाडा-नागपूर हायवे वर काही हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलनही केले. या प्रकरणावरुन भाजपानेही महाराष्ट्रातील शिवसेनेला सुनावले. हे प्रकरणावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता मध्य प्रदेश सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस?

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्यप्रदेश मधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपले 'प्रेम' दाखवलेलेच आहे.आता वेळ आहे शिवसेनेची!!त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस?We condemn the cowardly act of Congress Government in Madhya Pradesh which has dared to insult the Great Chhatrapati Shivaji Maharaj , Founder Hindavi Swarajaya. Will CM Uddhav Thackeray choose Satta Over Chatrapati Shivaji Maharaj ? Uddhav Thackeray#CONGinsultsChhatraptiShivaji

Gepostet von BJP Maharashtra am Mittwoch, 12. Februar 2020