छत्रपती घराण्याशी उदयनराजेंचे गादीचे की रक्ताचे नाते? – नवाब मलिक

272

मुंबई,दि.१६(पीसीबी) -“उदयनराजे यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. छत्रपती घराण्याशी गादीचं नातं आहे की रक्ताचं नातं आहे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नाचं उत्तर उदयनराजे यांच्याकडून अपेक्षित आहे. उदयनराजे यांनी उत्तर द्यायला हवे”,असा सवाल करीत नवाब मलिक यांनी संजय राऊत यांचे समर्थन केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल (१५ जानेवारी) एका मुलाखतीत खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप नेत्यांकडून त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात टीका केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी संजय राऊत यांचे समर्थन केले आहे.

दरम्यान, “कुणाची तंगडी कुणी तोडू शकत नाही. धमकी देऊन कधीही कुठलेही प्रश्न मिटत नाहीत. प्रश्नाला उत्तर धमकी नसते. प्रश्नांचे उत्तर त्यांना द्यायचे असतील तर द्यावे, नाही द्यायचे असतील तर नको द्यावे”, असे नवाब मलिक म्हणाले.

WhatsAppShare