छत्रपतींवर बोलण्याचा अधिकार आहेत ते गप्प का बसले आहेत?

97

मुंबई, दि.२१ (पीसीबी) – दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर शाब्दिक निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या फोटोचा वापर निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये केला जात आहे. त्यावर आता महाराष्ट्रातील प्रमुख नेते, ज्यांना असे वाटते की छत्रपतींवर बोलण्याचा त्यांनाच अधिकार आहेत ते गप्प का बसले आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.