छत्रपतींचा वारस लोकसभेतून बेवारस करण्याच्या हालचाली सुरू – दिवाकर रावते

0
499

सातारा, दि. १ (पीसीबी) – छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा वारस लोकसभेतून बेवारस करण्याच्या हालचाली सध्या साताऱ्यात सुरू आहेत. याला विरोध करत सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपतींचे वारस असलेले खासदार उदयनराजे भोसले यांना सर्व राजकीय पक्षांनी बिनविरोध निवडून दिले पाहिजे, असे मत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सातारा येथे व्यक्त केले.