छत्तीसगडमध्ये चकमकीत १४ नक्षलवादी ठार

159

  रांची, दि. ६ (पीसीबी) – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.  यावेळी सुरक्षा जवानांनी १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.  सुरक्षा यंत्रणांना मिळालेलं हे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान,  चकमक अद्याप सुरु असून १६ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  सकाळी रायपूरपासून ५०० किमी अंतरावर दक्षिण सुकमा भागात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु झाली. उपमहानिरीक्षक सुंदरराज (नक्षलविरोधी ऑपरेशन) यांनी १४ मृतदेह हाती लागले असल्याचे सांगितले.

पोलिसांना नक्षलवादी एका ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा जवान घटनास्थळी दाखल झाले होते. नक्षलवाद्यांनी गोळीबार करताच चकमकीला सुरुवात झाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर  दिले.