छगन भुजबळ- संजय राऊत यांच्यात नेमकी कोणती चर्चा ?    

139

नाशिक, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत एका साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. यावेळी या दोघांत गुजगोष्टी झाल्या. यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या दोघांमध्ये नेमक्या कोणत्याही विषयावर चर्चा झाली, याचा तर्क लावला जात होता.  

भुजबळ आणि राऊत पहिल्या रांगेत शेजारी- शेजारी बसले होते.  त्यांच्यात बराच वेळ गप्पा रंगल्या होत्या.  मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन नेते एकत्र आल्याने राजकीय चर्चांना सुरूवात झाली. त्यांच्या मध्ये इकडच्या तिकडच्या  गप्पा झाल्या ?  की त्यांनी राज्यातील पुरस्थितीवर चर्चा केली? की आणखी काही?  याबाबतच्या  तर्कवितर्कांना उधाण आले होते.

दरम्यान, मध्यतंरी छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा सुरू झाली होती. भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवांना ऊत आला होता. तर दुसरीकडे शिवसैनिकांकडून भुजबळ यांच्या प्रवेशाला विरोध करणारी पोस्टर लावली जात होती. भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावून आपण राष्ट्रवादी सोडणार नाही, असे स्पष्ट केले होते.