छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत

85

नाशिक, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ तुरूंगातून बाहेर आल्यानंतर  पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.    भुजबळ आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत, फटाके फोडून छगन भुजबळांचे जंगी स्वागत केले आहे. भुजबळ यांच्यासोबत समीर भुजबळदेखील आहेत.

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ तब्बल अडीच वर्षानंतर नाशिकमध्ये आले आहेत.  त्यांच्या स्वागतासाठी आधीपासूनच कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. शहरभरात भुजबळांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.

छगन भुजबळ नाशिक दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. राष्ट्रवादी भवनात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी छगन भुजबळ येवला मतदारसंघातील लोकांच्या भेटी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.