चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

159

नाशिक, दि. २६ (पीसीबी) –  चोर समजून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवार (दि.२५) दुपारच्या सुमारास नाशिकच्या सिडको मोरवाडी परिसरात घडली.

राहुल जाधव असे मृत तरुणाचे नाव होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिडको मोरवाडी परिसरातिल विनायक ट्रेडर्स या दुकानात बुधवारी दुपारी राहुल गेला होता. राहुल याच परिसरात राहणारा होता. राहुलने चोरी केली असा संशय घेऊन दुकानमालक गणेशमल राठी याने त्याला बांधून ठेवले. तुझे अजून कोण कोण साथीदार आहेत, अशी राहुलला विचारणा करत बेदम मारहाण करायला सुरुवात केली. काही वेळातच राहुलची प्रकृती बिघडल्याचे दिसून येताच दुकानमालकानेच राहुलला घरच्यांच्या ताब्यात दिले. मात्र त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दुकानमालक गणेशमल राठी याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.