चोर येऊन लुटून आम्हाला पार नागडं करून गेले; केदार शिंदेंचा मोदींना टोला

243

मुंबई, दि. १८ (पीसीबी) –  मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते केदार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून उपहासात्मक टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शांत बसण्यावर त्यांनी आक्षेप घेत ….आणि मालक…. बोलत राहिला…सवयीप्रमाणे चौकीदार शांत होता.. अशा शब्दांत  ट्वीट केले आहे.

चौकीदार फक्त रात्रीच ओरडून झोपमोड करतो. आधी त्याचे जागे राहणे कौतुकास्पद वाटत होते. मग कळून चुकले त्याला तेवढंच जमतं. चोर येऊन लुटून आम्हाला पार नागडं करून गेले.. तो फक्त जागा होता. आधीच्यांनी वेगळं काय केलं होतं? , अशी सडकून टीका शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर  केली आहे.

दरम्यान, कलाकार, अभिनेते यांनी याआधी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीवर टिप्पणी केली आहे. तर काही कलाकारांनी मोदी यांना मतदान करू नये, असे आवाहन केले होते. तर काही कलाकार मोदींच्या समर्थनार्थ पुढे आले होते. यावरून मोदी यांच्याबद्द्ल कला विश्वात दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले.