चोर चोरी करायला गेला आणि…

47

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) : अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून टीव्ही, दागिने आणि पेन ड्राइव्ह चोरून नेला. ही घटना 7 सप्टेंबर रोजी सकाळी इंदिरानगर चिंचवड येथे उघडकीस आली. साई संदीप वरलाकाटी (वय 34, रा. विशाल अंगण अपार्टमेंट, इंदिरानगर, चिंचवड) यांनी याबाबत सोमवारी (दि. 13) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांच्या घराला कुलूप लावून मूळगावी निजामाबाद तेलंगणा येथे गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून टीव्ही, सोन्याचे दागिने आणि पेन ड्राईव्ह असा एकूण 60 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी सात सप्टेंबर रोजी गावाहून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहे

WhatsAppShare