चोरटे सुसाट। भोसरीत भर दिवसा झाली घरफोडी

127

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – भोसरी मधील भगत वस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी एका घरात भरदिवसा घरफोडी केली. त्यामध्ये चोरट्यांनी 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि.19) दुपारी साडेतीन ते पाच वाजताच या कालावधीत घडली.

कैलास लक्ष्मण कौदरे (वय 45, रा. भगत वस्ती, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर सोमवारी दुपारी साडेतीन ते पाच वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून टीव्ही, दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.