चोरटे एटीएम सेंटरमध्ये घुसले खरे; पण पैशाऐवजी चोरली हि वस्तू ……..

86

दिघी, दि. २८ (पीसीबी) – दिघी आळंदी रोडवर देवकृपा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एटीएम सेंटरमधून दोन अनोळखी चोरट्यांनी सात बॅटऱ्या चोरून नेल्या. ही घटना 23 जुलै रोजी पहाटे पावणे सहा वाजताच्या सुमारास घडली.

मनिषकुमार जनक सिंग (वय 39, रा. हडपसर) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 27) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी आळंदी रोडवर काळे कॉलनी येथे देवकृपा पेट्रोल पंपाजवळ एटीएम आहे. 23 जुलै रोजी पहाटे पावणे सहा वाजता दोन अनोळखी चोरट्यांनी एटीएम सेंटरमधून 83 हजार 328 रुपये किमतीच्या सात बॅटऱ्या चोरून नेल्या. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare