चोरटयांनी असा केला प्लॅन आणि केली घरफोडी

25

तळेगाव दाभाडे, दि. २२ (पीसीबी) – घराच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील तोडून त्या घरातून एक लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 21) रात्री एक ते पहाटे चार वाजताच्या कालावधीत वतननगर, तळेगाव स्टेशन येथे घडली.

सलिल सतीश पारनेरकर (वय 36, रा. वतननगर, तळेगाव स्टेशन) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फिर्यादी घरी नव्हते. रात्री एक ते पहाटे चार वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील खिडकीचे ग्रिल तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare