चूक एकाची. शिक्षा मात्र दोघांना; शेवटी ‘त्या’ कंटेनर चालकाला अटक

0

चिंचवड, दि.8 (पीसीबी) : भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचा-याला धडक दिली. त्यात पादचा-याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढे कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. ६) सकाळी सव्वानऊ वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे घडली.

 दत्तू वचकल (वय ३५, रा. गिरीमगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.

प्रकाश दोडके (वय ५७, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रवीण रामलिंग सांगोळी (वय २८, रा. मोहननगर, चिंचवड) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याबाबत दोडके यांच्या पत्नी मनीषा प्रकाश दोडके (वय ४५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमार कंटेनर घेऊन जुना पुणे-मुंबई महामार्गावरून चिंचवडकडून पिंपरीच्या दिशेने जात होता. एम्पायर इस्टेट पुलाजवळ मयत प्रकाश दोडके हे पायी रस्ता ओलांडत होते. राजकुमार याने कंटेनरने त्यांना धडक दिली. त्यात दोडके गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर राजकुमार याने पुढे काही अंतरावर जखमी सांगोळी यांच्या मोपेड दुचाकीला (एम एच १४ / ई ई ८६६५) धडक दिली. त्यात सांगोळी गंभीर जखमी झाले. त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. पोलिसांनी राजकुमार याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare