चीनचे विमान जाणीवपूर्वक पाडले,१३२ प्रवासी ठार

0
434

बिजींग, दि. १८ (पीसीबी) – मार्चमध्ये चीनच्या दक्षिणेकडील ग्वांग्शी प्रांतात क्रॅश झालेल्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे विमान थेट जमिनीच्या दिशेने कोसळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार मोठा खुलासा झालाय.
वैमानिकांनी हे विमान जाणूनबुजून क्रॅश केल्याचं दिसतं. अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला. त्यातून मिळालेल्या डेटानुसार कॉकपिटमधील कोणीतरी जाणूनबुजून विमान क्रॅश केल्याचं स्पष्ट झालंय. Flight Radar24 कडून मिळालेल्या माहितीनुसार 132 प्रवासी घेऊन जाणारे बोईंग 737 29,000 पॉईँटवरून सुमारे 700 mph वेगाने उड्डाण करत होतं. याच वेळी अपघात झाला. या दुर्घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. चीनच्या 28 वर्षांतील ही सर्वात मोठी विमानाची दुर्घटना होती.