चीनचे आणखी एक षडयंत्र उघड: धोकादायक रसायने लावलेली खेळणी भारतासह अनेक देशांना पाठवली

111

वॉशिंग्टन, दि.२४ (पीसीबी) : अवघ्या जगाला कोरोना महामारीच्या संकटात ढकलणाऱ्या चीनने आपली कुकृत्ये सुरूच ठेवली आहेत. आता चीनने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये राहणाऱ्या लहानग्यांना लक्ष्य केले आहे. चीन भारतासह विविध देशांमध्ये धोकादायक रसायनांचा थर लागलेली खेळणी पाठवत आहे. ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्पारिणाम होत असल्याचे आढळले आहे. शुक्रवारी मोठी कारवाई करत अमेरिकेने चीनमध्ये बनवलेल्या अनेक खेळण्यांचा मोठा माल जप्त केला आहे. पकडलेली ही खेळणी भारतात खूप लोकप्रिय आहेत.

अमेरिकेने जप्त केलेल्या चिनी खेळण्यांच्या लॉटमध्ये शिसे, कॅडमियम, बेरियम यासारख्या रासायनिक पदार्थांचा जास्त वापर करण्यात आला आहे. 16 जुलै रोजी अमेरिकेने या खेळण्यांची प्राथमिक चाचणी केली, त्यानंतर त्यांना प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या खेळण्यांमध्ये मानकांपेक्षा जास्त रासायनिक पदार्थ वापरले गेले आहेत.

अमेरिकेने चीनचे सात बॉक्स जप्त केले. हे सर्व खेळण्यांनी भरलेले आहेत. खेळण्यांच्या मालामध्ये ‘लगोरी 7 स्टोन’ गेमचे 295 पॅकेट्सदेखील आहेत. हा खेळ भारतात खूप लोकप्रिय आहे. त्याला भारतात पिट्टू किंवा सातोलिया म्हणतात. ऑनलाइन खेळणी खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

WhatsAppShare