चिपी विमानतळावरील विमानाची चाचणी बेकायदा; नारायण राणेंचा आरोप

222

कुडाळ, दि. १२ (पीसीबी) – सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील पहिल्याच विमानाची चाचणी  बेकायदा आहे. हे विमान खासगी असून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पैसे देऊन  आणले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केला आहे. 

सिंधुदुर्गात गणेशोत्सवापूर्वी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. आज (बुधवार) चिपी विमानतळावर १२ आसनी विमान लँड झाले. या विमानात गणपतीबाप्पाची मूर्ती देखील होती. हे विमान चेन्नईहून सिंधुदुर्गात आले.

दरम्यान, या विमान चाचणीवर हरकत घेत चिपीत उतरलेले हे विमान खासगी कंपनीचे आहे आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ते पैसे देऊन आणले आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला.  तर राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनीही हे विमान खासगी असल्याचे म्हटले होते. पालकमंत्री केसरकर यांनी या विमानातून येऊन दाखवावे, असे आव्हान नितेश  यांनी मंगळवारी दिले होते.