चिखली परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; बंदोबस्त करण्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे मागणी

169

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – चिखली परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कुत्र्याच्या भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यावर तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक दिनेश यादव यांनी पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्याकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, चिखली परिसरातील कुदळवाडी, जाधववाडी, पंतनगर, मोशी रोड याठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री फिरत असतात. अनेक वेळा वाहन चालवणाऱ्या नागरिकांच्या मागे धावतात, लहान मुले, महिलाना देखील कुत्राची भिती पसरली असल्याने नागरिाकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

\दरम्यान, अनेक नागरिकांना मोकाट कुत्रानी चावा देखील घेतला आहे. तरी त्यांच्या लवकर बंदोबस्त करावा, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगरसेवक दिनेश यादव, किशोर लोंढे, रोहित जगताप आदी उपस्थित होते.