चिखली घरकुल येथे पार्क केलेली रिक्षा बाजुला काढल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला

135

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – कचरा टाकण्याच्या कारणावरुन तसचे पार्क केलेली रिक्षा बाजुला घेतल्याच्या रागातून दाम्पत्याने एकाला मिरचीचीपुड डोळ्यात टाकुन, तसेच लोखंडी रॉड डोक्यात आणि तोंडावर मारुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिखली घरकुल येथील मोरया हौसिंग सोसायटी बिल्डिंग क्र. ३४/३०५ येथे घडली.

प्रविण नारायण दुसाणे (वय ४७, रा. मोरया हौसिंग सोसायटी बिल्डिंग क्र. ३४/३०५, घरकुल, चिखली) असे जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोपट आरणे आणि रेखा आरणे (रा. मोरया हौसिंग सोसायटी बिल्डिंग क्र. ३४/३०५, घरकुल, चिखली) या दोघांविरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रविण आरोपी पोपट आणि रेखा हे एकाच परिसरात राहतात. सोमवारी सकाळी प्रविण यांच्या पत्नी आणि रेखा यांच्यामध्ये कचरा टाकण्याच्या कारणावरुन भांडण झाले. त्यानंतर काही वेळानी पोपट यांनी प्रविण यांच्या जागेत त्यांची रिक्षा उभी केली. यामुळे प्रविण यांनी ती बाजुला काडली. याचा राग मनात धरुन आरोपी रेखा आणि पोपट या दोघांनी मिळून प्रविण यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून लोखंडी रॉडने डोक्यात, तोंडावर आणि हातावर मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोपट आणि रेखा या दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.