चिखलीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

284

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.२६) रात्री उशीरा दोनच्या सुमारास चिखली मोरे वस्तीतील अष्टविनायक चौक येथे घडली.

मृताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई एस.व्ही.आगलावे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास चिखली येथील मोरे वस्तीतील अष्टविनायक चौकात अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला आहे. मयत इसमाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. निगडी पोलिस तपास करत आहेत.