चिखलीत सिध्देश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर  

201

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – चिखलीतील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती येथील  सिध्देश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचा चतुर्थ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.  

याप्रसंगी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे, नगरसेविका साधना मळेकर, नगरसेवक कुंदन गायकवाड आदी उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. औषधोपचार व मार्गदर्शन मोफत करण्यात आले. या प्रसंगी मोरे वस्तीतील सुर्या हॉस्पीटलचे डॉ. दत्तात्रय सुर्यवंशी, डॉ. रविंद्र कुलकर्णी, सुभा म्हसके व इतर कर्मचाऱ्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

सिध्देश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लालासाहेब मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.