चिखलीत वडापाव विक्रेत्याकडून पिस्टल जप्त

265

भोसरी, दि. २ (पीसीबी) – चिखळी येथील एका वडापाव विक्रेत्याकडून निगडी पोलिसांनी एक पिस्टल आणि जीवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी (दि. १) सायंकाळी सहाच्या सुमारास चिखली येथील भाजी मंडईत करण्यात आली.

सागर श्रीराम संकपाळ (वय ३४, रा. साईचौक, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील भाजी मंडईत वडापावची विक्री करणाऱ्याकडे पिस्टल असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून संकपाळ याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जीवंत काडतूस असा एकूण ४० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.