चिखलीत रेकॉ़र्ड वरील गुन्हेगाराला पिस्तुल आणि काडतुसांसह अटक

648

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – रेकॉर्ड वरील एका सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २५) रात्री सातच्या सुमारास चिखलीतील वेदांत हॉटेल समोर  करण्यात आली.

संजय दामू नानेकर (वय २१, रा. नानेकरवाडी ग्रामपंचायत शेजारी, चाकण, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सातच्या सुमारास निगडी पोलिसांचे एक पथक निगडी पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस नाईक संदीप पाटील यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, चिखलीतील हॉटेल वेदांत समोर एक तरुण गावठी पिस्तुल घेऊन थांबला आहे. यावर निगडी पोलिसांच्या पथकाने चिखलीतील हॉटेल वेदांत जवळ सापळा रचून संजय नानेकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी संजयला पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.