चिखलीत भंगाराची आठ गोदामे जळून खाक

60

चिखली, दि. १५ (पीसीबी) – भंगारच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत भंगाराची आठ गोदामे जळून खाक झाली. यामध्ये तब्बल सहा लाखांचे नुकसाना झाले. ही घटना गुरुवारी (दि.१४) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिखली-आळंदी रस्त्यावर घडली.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चिखली-आळंदी रस्त्यावर भारत स्क्रॅप सेंटर नावाचे भंगारचे गोदाम आहे. या गोदामाला गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागाचे दोन आणि चिखली, तळवडे, प्राधिकरण अग्निशमन विभागाचे प्रत्येकी एक तसेच टाटा मोटर्सचा एक असे एकूण सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर आजुबाजुच्या आणखी सात भंगाराच्या गोदामांना आग लागली होती. रात्री उशी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यामध्ये एकूण ६ लाखांचे नुकसाना झाले असून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. तर आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.