चिखलीत बसच्या धडकेत जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

82

चिखली, दि. १३ (पीसीबी) – बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.२४ जून) रात्री आठच्या सुमारास चिखलीतील साने चौकात असलेल्या वक्रतुंड हॉटेल समोर झाला होता. सोमवारी (दि.२ जुलै) जखमी वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पांडुरंग रामराव महानोर (वय ६०, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अपघातात जखमी होऊन मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी बस चालक लक्ष्मण निनाजी दाबेराव (वय ५०, रा. नेवाळे वस्ती चिखली) याच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२४ जून) वृध्द पांडुरंग महानोर हे चिखलीतील साने चौकात असलेल्या वक्रतुंड हॉटेल समोरील रस्त्यावरुन रात्री आठच्या सुमारास पायी जात होते. यावेळी भरधाव वेघाने येणाऱ्या बसचालक लक्ष्मण दाबेराव यांनी त्यांच्या ताब्यातील बसने महानोर यांना जोरदार धडक दिली. यात महानोर हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र महानोर याचा सोमवारी (दि.२ जुलै) उपचारादरम्यान मृत्यू झाला. बस चालक लक्ष्मण दाबेराव याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलिस तपास करत आहेत.